मित्राच्या वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मित्राच्या वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

      पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  मित्राच्या वाढदिवसाला दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.हा अपघात मंगळवारी(दि.11) रात्री भोसेगाव, चाकण येथे घडला आहे.

प्रसाद संभाजी सुरवसे (वय 19) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारचालक दिनेश नारायण गोसाळकर (वय51 रा भोसे चाकण ,) याला अटक केली आहे.याप्रकरणी मयत तरुणाचे चुलते शिवाजी सुरवसे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रसाद व त्याचा मित्र सुदर्शन योगेश जाधव हे दुचाकीवरून त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी निघाले होते. यावेळी ते चाकण शिक्रापूर रोडवरील भोसेगाव येथील राजनंदिनी हॉटेल जवळ आले असता आरोपी याने त्याच्या ताब्यातील इको गाडी भरधाव वेगात आणत प्रसादाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये प्रसादाचा जागीच मृत्यू झाला असून सुदर्शन हा गंभीर रित्या जखमी आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे