लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्ताची तोडफोड, तिरंगा काढला, तोडफोड केली (video)
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली - खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली. रविवारी सायंकाळी शेकडो खलिस्तान समर्थक भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमले. या समर्थकांनी कार्यालयाबाहेरच्या भारतीय राष्ट्रध्वजाचाही अपमान केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमृतपाल सिंग याच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, वेळीच भारतीय उच्चायुक्ताच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
खलिस्तान समर्थकांच्या हातात खलिस्तानी झेंडा आणि अमृतपाल सिंगचे पोस्टर होते. पोस्टर्सवर 'फ्री अमृतपाल सिंग', आम्हाला न्यायल पाहिजे, आम्ही अमृतपाल सिंगच्या सोबत आहोत. आम्ही अमृतपाल सिंगसोबत आहोत, असे लिहिले आहे. एक व्यक्ती 'खलिस्तान झिंदाबाद' म्हणतानाही ऐकू आली.
पंजाबमधील अजनाळा पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या अमृतपालसिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिस गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मोहीम राबवत आहेत. पोलिसांनी रविवारी अमृतपालच्या आणखी 34 साथीदारांना अटक केली. आतापर्यंत पोलिसांनी 114 जणांना अटक केली आहे. राज्यभर फ्लॅग मार्च काढण्यात येत आहेत. दुसरीकडे, अमृतपालच्या समर्थकांनी दावा केला की, रात्री उशिरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांनी याला नकार दिला.
दरम्यान, या प्रकाराचा भारताकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर यासंदर्बातील प्रेस रिलीज शेअर केली आहे. “ब्रिटनच्या भारतातील सर्वात ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश भारत सरकारने दिले. लंडनमधील प्रकाराबद्दल भारतानं आपली तीव्र नापसंती व्यक्त केली आहे”, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
यावेळी भारत सरकारने ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. “या आंदोलकांना भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालय परिसरात येण्यापासून कोणताही मज्जाव करण्यात आला नाही. कारण त्यावेळी ब्रिटिश सुरक्षा पूर्णपणे अनुपस्थित होती. यासंदर्भात व्हिएन्ना करारानुसार ब्रिटिश सरकारच्या कर्तव्याची जाणीव या ब्रिटिश अधिकाऱ्यांना करून देण्यात आली आहे”, असंही भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
पंजाब पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अमृतपालचे नाव अवतारसिंग खांडा सोबत जोडले जात आहे. अवतारसिंग खांडा हा 'बब्बर खालसा' प्रमुख परमजीतसिंग पम्मा याच्या जवळचा मानला जातो. तो पाकिस्तानात सध्या लपून बसला आहे. तो 'बब्बर खालसा यूके' चा तेथून चालवतो.
बब्बर खालसा सध्या प्रोजेक्ट K2 वर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याअंतर्गत काश्मीरमधील भडकाऊ कारवायांसोबतच पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ उभी करण्याची योजना आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनलचे प्रमुख परमजीत सिंग पम्मा आणि अवतार सिंग खांडा यांनी पंजाबमध्ये खलिस्तान चळवळीला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने अमृतपालला पंजाबला पाठवले होते.
पंजाबमध्ये सलग दुसऱ्या दिवशी खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल याच्या अटकेसाठी पोलिस राज्यात मोहीम राबवत आहेत. येथे जालंधर रेंजचे डीआयजी स्वपन शर्मा यांनी पत्रकार परिषदेत अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=OkgBlyBHIBo