तामिळनाडूतील ३ लाख 43 हजार नेटकऱ्यांनी #GoBackModi ट्विटस केले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तामिळनाडूतील ३ लाख 43 हजार नेटकऱ्यांनी #GoBackModi ट्विटस केले

नवी दिल्ली, दि. 26 मे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईत पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी, दळणवळण वाढवण्यासाठी आणि या क्षेत्रातील जनतेच्या जीवनातील सुलभतेला चालना देण्यासाठी काही प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. तसेच चेन्नईमध्ये 31,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 11 प्रकल्पांची पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर येणार असल्यानं तामिळ नेटकऱ्यांनी #GoBackModi हा ट्रेंड वापरुन ३ लाख ४३ ट्विटस केली आहेत. हा ट्रेंड आजच्या दिवसात प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पाच प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. 75 किमी लांबीच्या मदुराई-तेनी (रेल्वे गेज रूपांतरण प्रकल्प) या सुमारे 500 कोटी रुपये प्रकल्पखर्चाच्या या प्रकल्पामुळे या भागात सुगमता निर्माण होऊन या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल.

590 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तांबरम - चेंगलपट्टू दरम्यान 30 किमी लांबीच्या तिसऱ्या रेल्वेमार्गामुळे उपनगरीय मार्गांवरील सेवा अधिक उत्तम प्रकारे सुलभ होईल आणि आरामदायी प्रवासात वाढ होईल.

सुमारे 850 कोटी रुपये प्रकल्पखर्चाचा 115 किमी लांबीचा एन्नोर-चेंगलपट्टू आणि सुमारे 910 कोटी रुपये प्रकल्पखर्चाची ईटीबीपीएनएमटीच्या (ETBPNMT)तिरुवल्लूर-बेंगळुरू क्षेत्रातील 271 किमी लांबीची नैसर्गिक गॅस पाईपलाईन यामुळे तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील उद्योगांना तसेच इतर ग्राहकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा सुलभ होईल.

या कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजना-शहरी याअंतर्गत लाइट हाऊस प्रकल्प- चेन्नईचा एक भाग म्हणून बांधलेल्या 116 कोटी रुपये खर्चाच्या 1152 घरांचे उद्‌घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.