गोव्याला फिरायला जाताय ? मग ही बातमी वाचाच, नाहीतर पस्तवाल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गोव्याला फिरायला जाताय ? मग ही बातमी वाचाच, नाहीतर पस्तवाल
गोव्याला फिरायला जाताय ? मग ही बातमी वाचाच, नाहीतर पस्तवाल

कोल्हापूर, दि. 31 मे – गोवा हे असे राज्य आहे की, पर्यटनासाठी देशभर ओळखले जाते. येथील समुद्र व बीच सगळ्यांना खुणावत आपल्याकडे बोलावत असतो. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देण्यात येत असतात. गोव्याची अर्थव्यवस्था याच पर्यटकांवर अवलंबून आहे. पण याच गोव्यात असे काही घडले आहे की अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गोव्याला फिरायला जाण्याचा कोणाचा विचार असेल तर तो आता हजार वेळा विचार करेल. या घटनेमुळे गोव्याच्या आजवरच्या प्रतिमेला कलंक लागला आहे. नेमके काय घडले आहे ते पुढील बातमी वाचल्यावर समजलेच शिवाय या बातमीसोबत एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे तोही नीट पाहा.

महाराष्ट्रातील काही तरुण मुले जी 17-18 वर्षांची आहेत ती गोवा येथे फिरायला गेले होते. परत येताना त्यांच्यावर म्हापशा येथे त्यांच्यावर जो काही प्रसंग गुजारला ते पाहून प्रत्येकाच्या मस्तकाची शीर ठणकल्याशिवाय राहणार नाही. या तरुणांना स्वस्तात जेवण देतो असे सांगून एका खोलीत बंदिस्त करून ठेवले, त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. अंगावरील दागिने तर काढून घेतलेच  शिवाय घरच्यांना फोन करायला लावून पेटीएमद्वारे पैसे मागविले. त्यांच्या गुप्तांगावर प्रहार करण्यात आले. एवढ्यावरच थांबले नाही तर काही मुलींना बोलावून घेतले व त्यांच्याशी लगट करायला लावले, त्याचा व्हिडिओ काढून या मुलांना धमकी देण्यात आली की, जर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू.

जेव्हा त्या लुटारूंना कळले की ही मुले महाराष्ट्रातील आहेत तेव्हा त्यांनी शिवाजी छत्रपतींच्या नावाने अर्वाच्च शिवीगाळ केली. पण ही मुले काहीच करू शकत नव्हते कारण ते लुटारू शस्त्रसज्ज होतेच शिवाय त्यांची संख्याही दुप्पट होती. अनन्वीत छळ केल्यानंतर या मुलांना सोडून देण्यात आले. मुले कशीबशी आपल्या घरी परतली पण त्यांची मनःस्थिती पूर्णपणे बिघडून गेली होती. यातील दोन मुलांनी तर आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पण यातील एक मुलगा एका संतोष या  पत्रकाराकडे गेला व आपल्यावर गोव्यात झालेली आपबिती सांगितली. ते ऐकून संतोषलाही शॉक बसला आणि त्याने या मुलांना धीर दिला व गोव्यात पुन्हा जाऊन तक्रार देऊ असे सांगितले. पण मुलांना एवढा मानसिक धक्का बसला होता की पुन्हा गोव्यात जाण्यास राजी होत नव्हते. मग या पत्रकाराने महाराष्ट्रातील पोलीस बरोबर घेऊन गोव्यात गेले व रीतसर तक्रार दिली. या पत्रकाराने गोव्याचे मुख्यमंत्री सावंत व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व गोव्याचे निवडणुकीतील प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकाराची दखल घेण्यास सांगितले आहे. संतोषने ही सर्व घटना एका व्हिडिओमध्ये कथन करून तो व्हिडिओ व्हायरल केला आहे, जेणेकरून पर्यटकांनी याचा विचार करावा व या मुलांना न्याय मिळावा. या पूर्वी अशा किती घटना घडल्या, किती जणांना लुटले हे पोलीस तपासात कळेलच. जो पर्यंत या प्रकरणाचा छडा लागून आरोपींना शिक्षा होत नाही तो पर्यंत गोव्याला न गेलेलेच बरे, नाही का ?

पाहा व्हिडिओ