काँग्रेसकडून शनिवारी देशभर 'किसान विजय दिवस' !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

काँग्रेसकडून शनिवारी देशभर 'किसान विजय दिवस' !
नवी दिल्ली - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने उद्या शनिवारी (दि. 20 नोव्हेंबर) देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात उद्या किसान विजय दिवस साजरा करतानाच संपूर्ण देशभर किसान विजय रॅली काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी देशभरातील काँग्रेसच्या सर्व ब्लॉक प्रमुखांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण देशात विजय दिवस साजरा करा. रॅली काढा. तसेच देशाच्या विविध भागात संध्याकाळी कँडल मार्च काढून या संघर्षात बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करा, असं आवाहन काँग्रेसने केलं आहे.

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात संघर्ष उभा केला. त्याला काँग्रेससह विरोधी पक्षाने बळ दिलं. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं असा काँग्रेसचा दावा आहे. पुढील वर्षी पंजाब, गोवा, उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने उद्या देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मोदींनी कायदे मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटले. त्यांचं दु:ख मी समजू शकते. सरकार गंभीर आहे तर त्यांनी लखीमपूर खेरीबाबत योग्य कार्यवाही करावी. केंद्रीय मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या देशात शेतकऱ्यांसोबत सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. ते कर्जात बुडाले आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्या गोष्टी आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्यावी. ते प्रश्न सोडावावेत, अशी मागणीही प्रियंका गांधी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही आणि दहशतवादी कोण म्हणालं होतं? तुमचेच नेते हे बोलत होते ना? त्यावेळी तुम्ही काय करत होता. तेव्हा मोदी गप्प का होते? मोदींनीच शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवलं होतं, असेही प्रियांका म्हणाल्या.