बिबट्या आला पुण्याच्या वेशीवर; पकडण्यात आले यश (Video)

पुण्यातील वाजरे माळवाडी परिसरात आज सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला. यामुळे येथील नागरिक दहशतीत होते.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बिबट्या आला पुण्याच्या वेशीवर; पकडण्यात आले यश (Video)

पुणे - पुण्याच्या वेशीवर बिबट्या आला असून नागरिक दहशतीत आहेत. सोमवारी सकाळी पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरात बिबट्या मानवी वस्तीत शिरला. सकाळी बिबट्याला पाहून नागरिक घाबरले. बिबट्यापासून वाचण्यासाठी नागरिक पळू लागले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे पथक घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. तब्बल दोन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.

वारजे माळवाडी भागातील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला. अचानक बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये दहशत माजली. बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी नागरिक पळू लागले. दरम्यान, बिबट्या एका पत्राच्या शेडमध्ये जाऊन लपला. ही माहिती पोलीस अधिकारी व वन विभाग अधिकारी यांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी ८ वाजता पासून वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बिबत्याला पकडण्यासाठी मोहीम राबवली.

एका इमारतीच्या बाजूला असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये बिबट्या लपलेला होता. बिबट्याला पकडण्यासाठी एक मोठी जाळी टाकण्यात आली पण बिबट्याने तिथून पळ काढला. यानंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन (डार्ट) मारण्यात आला. यानंतर थोड्या वेळाने बिबट्या बेशुद्ध झाल्यावर वनविभागाने त्याला पिंजऱ्यात बंद करत रेस्क्यू सेंटरला दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून पुन्हा त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. या ठिकाणी असेलेल्या जंगलातून हा बिबट्या मानवी वस्तीत शिरला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पूर्वीही या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. वारंवार येथे बिबट्या दिसत असल्याने त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोंढवे धावडेसह हिंजवडी भागातील फेज थ्रीमध्ये बिबट्या पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हिंजवाडी फेज थ्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील शिंदे वस्तीत संभाजी जाधव यांच्या घरात शिरूर पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा व्हिडीओ सीसी कॅमेरात कैद झाला. बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून अधिक काळ नेरे, जांबे आणि कासारसाई भागामध्ये खुलेआम वावर आहे. यामुळे भागामधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

https://www.youtube.com/watch?v=dI2AviCnmKg