वेश्याव्यवसायात ढकलेल्या तरुणीची सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ

मला भुसावळ, मुंबई, जयपूर ज्या-ज्या ठिकाणी पाठविण्यात आलं तिथे-तिथे मी गेली आणि यांना कोट्यवधी रुपये कमावून दिले', असे मुलीने व्हिडिओत सांगितले आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वेश्याव्यवसायात ढकलेल्या तरुणीची सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ

'नमस्कार, मी माझ्या स्वेच्छेने व्हिडिओ बनवत आहे, कोणतीही जबरदस्ती नाही, दबाव नाही. मी 10 वर्षांची असताना मला माधोपूरमध्ये विकण्यात आले. 11 व्या वर्षी मला या व्यवसायात ढकलण्यात आले. एक-दोन वर्षे तिथे ठेवल्यानंतर माझी विक्री झाली. टोंकच्या देवळी तहसील पोलाडा येथे मला 8-9 वर्ष धंदा करायला भाग पाडलं.'

'यानंतर मला भुसावळ, मुंबई, जयपूर ज्या-ज्या ठिकाणी पाठविण्यात आलं तिथे-तिथे मी गेली आणि यांना कोट्यवधी रुपये कमावून दिले', असे मुलीने सांगितले. 'किशनने मला विकत घेतले होते. शंभू आणि प्रेमने माझ्यावर खूप अत्याचार केला. ते अनेक मुलींना विकतात. मलाही त्यांनी विकले. त्यांनी अनके मुलींवर अत्याचार केले आहेत. किशनने मला 20 लाख रुपयांना विकत घेतले. त्यांनी मला 8-9 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी धंदा करायला लावला.'

कोट्यवधी रुपये मी त्यांना कमावून दिले. मी यातना सहन केल्या आहेत. पण मी आता या अत्याचारांनी थकली आहे. त्यांच्या भीतीने मी लपून बसली आहे. मला न्याय द्या, मी खूप थकली आहे. त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. सरकारने मला न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. ते माझ्या पालकांकडे जातात आणि 30-30 आणि 40-40 लाख रुपये मागतात. त्यांना त्रास देतात, ब्लॅकमेल करतात.'

मुलगी म्हणाली की, माझे गावी येणे-जाणे नाही. माझं बालपण त्यांनी बरबाद केलं. माझे आयुष्य उध्वस्त केले. मी लोकांनाही पुढे येण्याची विनंती करते. भीतीपोटी कोणी बोलत नाही हे तुम्हा लोकांना माहीत आहे. माझ्या कुटुंबीयांना मारलं किंवा काहीही झालं तर त्याला किशन पोलाडा जबाबदार असेल.'

अशा प्रकारची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता लक्ष घातले असून, चौकशीला सुरुवात केली आहे. ही तरुणी आहे भिलवाडा (राजस्थान) येथील. या प्रकरणी भिलवाडा एसपी आदर्श सिद्धू म्हणाले की, हा व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला आहे. व्हिडिओ समोर येताच मुलीची ओळख पटली असून तिचा शोध घेण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीने केलेल्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास डेप्युटी एसपींकडे सोपवण्यात आला असून, मुलीचे जबाब घेण्यात आले असून, तिचे मेडिकलही करण्यात आले आहे. लवकरच कारवाई केली जाईल. आरोपींची चौकशी सुरू आहे. लवकरच याप्रकरणी गुन्हा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.