पीएमपी बस प्रवासात महिलेच्या पर्समधून रोकड लंपास
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी (प्रबोधन न्यूज ) - पीएमपी बस प्रवासात एका प्रवासी महिलेच्या पर्समधून 59 हजार 200 रुपये काढून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 6) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास परांडेनगर ते दत्तनगर बस थांब्यादरम्यान दिघी येथे घडली.
याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विश्रांतवाडी ते दत्तनगर दिघी या मार्गावरून पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. बस प्रवासात तीन ते चार अनोळखी महिला फिर्यादिजवळ येऊन गर्दी करून थांबल्या. त्या महिलांनी ढकलाढकली करून फिर्यादी यांच्या पर्समधून 59 हजार 200 रुपये रोख रक्कम काढून चोरून नेली. दत्तनगर येथे उतरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.