मुलीच्या अंत्यसंस्कारावेळीच आई व बहीण फरार

दगडाला पाझर फुटणाऱ्या घटनेत माता ना तू वैरीणी असे वर्तन नातेवाईकांनीच टाळली मृतदेहाची विटंबना.

मुलीच्या अंत्यसंस्कारावेळीच आई व बहीण फरार

पिंपरी – खराळवाडी येथील मुलीच्या संशयास्पद प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या आईची आणि बहिणीची काल रात्री चौकशी केल्याचे समजते. दरम्यान या मुलीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमी जवळूनच मुलीच्या आईने आणि बहिणीने काढता पाय घेतला. त्या घरी न परतल्याने फरार झाल्या असाव्यात अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

खराळवाडीतील या अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात अनेक बड्या धेंडांचा हात असल्याचा संशय प्रबोधन न्यूजने व्यक्त केला होता. त्यात तथ्य असल्याचे अनेक बाबतीत स्पष्ट होत आहे. येरवडा पोलिसांनी या प्रकरणात एकाला ताब्यात घेतल्याचे बोलले जाते. मात्र पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

या मुलीचा मृतदेह शुक्रवारी दुपारी खराळवाडीत आणण्यात आला. चौकात काही काळ थांबून नंतर तो अंत्यसंस्कारासाठी भाटनगर, पिंपरी येथील स्मशानभूमीत नेण्यात आला. या सर्व काळात मुलीची आई आणि बहिण त्यांच्या सोबत होती. मात्र स्मशानभूमीत मृतदेह ठेवल्यानंतर या दोघीही दिसेनाशा झाल्या. उपस्थितांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

आजूबाजूच्या लोकांना फोन करून घरी परतल्या का हे पाहण्यास सांगितले. मात्र त्या घरी नसल्याचे निष्पन्न झाले. मृत्यू होऊन सुमारे दोन दिवस उलटल्याने मृतदेहाची विटंबना आणखी होऊ नये म्हणून अखेर नातेवाईकांनीच अंत्यसंस्कार केले.

फरार का झाल्या ?

  • या मुलीच्या आई आणि बहिणीच्या वर्तनाबद्दल स्थानिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास एका निर्णायक टप्प्यावर येत असताना या दोघींच्या फरार होण्यामुळे त्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. या मुलीच्या मृत्युप्रकरणात या दोघींचा काही सहभाग आहे का याचाही तपास होणे आवश्यक आहे. जर या दोघींचा सहभाग नसेल तर या दोघी फरार का झाल्या असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत. केवळ या मुलीचाच नव्हे तर तिच्या प्रियकराच्या आत्महत्ये मागेही या मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणातील आरोपी कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.