राज्यव्यापी शासकीय-निमशासकीय कर्मचारी संप मागे

जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला संप बैठकीनंतर मागे घेण्याची घोषणा कर्मचाऱ्यांचे नेते संभाजी थोरात यांनी केली आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यव्यापी शासकीय-निमशासकीय कर्मचारी संप मागे

जुन्या पेन्शन योजनेसाठी बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा

मुंबई - राज्यव्यापी कर्मचारी संप मागे घेण्यात आला आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला संप बैठकीनंतर मागे घेण्याची घोषणा कर्मचाऱ्यांचे नेते संभाजी थोरात यांनी केली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दोन दिवसात या संदर्भात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अहवालाअंती चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संपकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्यभरातील सुमारे १६ लाख कर्मचारी संपावर आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. मात्र, राज्य सरकारने ही योजना लागू करण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार आणि कर्मचारी संघटन आजपासून अनिश्चित कालीन संपावर आहेत.