शरद पवारांचे आणखी तीन शिलेदार कमी होणार? आमदारांनी घेतली अजितदादांची भेट
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. गेल्या रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून, संख्याबळ आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शरद पवार यांच्या गटातील आणखी तीन आमदार कमी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील तीन आमदारांनी रात्री उशीरा अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. गेल्या रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून, संख्याबळ आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शरद पवार यांच्या गटातील आणखी तीन आमदार कमी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील तीन आमदारांनी रात्री उशीरा अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान दुसरीकडे धाराशिवमध्येही शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे अस्वस्थ होऊन आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे. सुरेश बिराजदार यांचा राजीनामा हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.