शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी पुण्यातील एका तरुणाला अटक

साईनाथ दुर्गे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अक्षय धनदार असं पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी पुण्यातील एका तरुणाला अटक

पुणे - माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकास सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू असून, मुंबई, कल्याणपाठोपाठ पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आलं आहे. युवा सेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांच्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

साईनाथ दुर्गे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अक्षय धनदार असं पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. 13 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली. अक्षय धनदारने शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वेचा व्हिडीओ शिवसेना ग्रुपवर शेअर केल्याचा आरोप आहे.

शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करत दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडीओ व्हायरल प्रकरणात पोलिसांनी मुंबई, कल्याण, पुण्यातून आरोपींना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला अशोक मिश्रा, मानस कुवर यांना अटक केली होती. त्यानंतर रवींद्र चौधरी आणि विनायक डायरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणमधून अटक करण्यात आलेला विनायक डायरे हा फेसबुकवरील मातोश्री पेज चालवतो. शीतल म्हात्रे यांनी केलेल्या आरोपानुसार मातोश्री या पेजवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आणि त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तो व्हायरल केला.

दरम्यान, याप्रकरणी कालही सभागृहात महिला आमदारांनी लक्षवेधी मांडली. अशा पद्धतीने व्हिडीओ व्हायरल करून संसार उद्ध्वस्त केले गेले तर राजकारणात महिला येणार नाहीत, असं महिला आमदारांनी सांगितलं. दरम्यान, आजही याप्रश्नी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न मांडला. याप्रकरणी लवकरात लवकर व्हिडीओची तपासणी व्हावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

म्हात्रे आणि सुर्वे प्रकरणात एसआयटी लावलेली आहे. याबाबत कामकाज लवकर सुरू होईल अशी अपेक्षा. पण या प्रकरणात कालपासून १४ पोरांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडीओ ओरिजिनल आहे की मॉर्फ आहे याचा निर्णय तर येऊद्या. त्या पोरांच्या घरी रात्री २ वाजता जाऊन पोलीस पोरांना घेऊन येत आहेत. त्या पोरांची चुकी काय हे तर पोरांना कळूद्यात. आपण संवेदनशील होऊन याला उत्तर तरी द्या. तरुण पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात मांडलं.

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांची तक्रार आल्यानंतर पोलीस कारवाई करत आहेत. ही बाब गंभीर आहे. शीतल म्हात्रे माध्यमांशी बोलताना रडत रडत थांबल्या आणि निघून गेल्या. रात्री दोन वाजता पोरांना उचललं, हे मान्य आहे. पण हा तपासाचा भाग आहे. अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का? असा संतप्त सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. पोलीस पोलिसांचं काम करत आहेत. पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणात कोण दोषी आहेत हे तपासातून समोर येईल, असंही ते म्हणाले.