दादांच्या एन्ट्रीने दादांची एक्झिट!
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजपशी हातमिळवली केली आहे. विश्वासू लोकांनीच दगा दिल्याने शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. पण पुण्यात भाजपची पुरती गोची होणार आहे. कारण अजित पवारांनी पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. सध्या पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. भाजप काय मांडवली करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
गेली वर्षभर अजित पवारांच्या बंडाबाबतच्या बातम्या तशा अधूनमधून येतच होत्या. त्याला अखेर गेल्या रविवारी मूर्त स्वरूप आलं. अजित पवार 30-40 आमदारांसह थेट सत्तेत डेरेदाखल झाल्याने पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची कशी जिरवली, अशा आनंदात केंद्रातील भाजप नेते असतीलही पण पुणे भाजप मात्र पुरती गपगार झाली आहे. कारण अजित पवार फक्त उपमुख्यमंञी घेऊन गप्प बसणाऱ्यातले नाही तर ते पुणे पाललकमंत्री पदावरही ताबा मारणार हे सर्वांनाच ठाऊक आहे. किंबहुना भाजपसोबत जाताना बोलीच तशी झालेली आहे. म्हणूनच पालकमंत्री पदाच्या संभाव्य बदलाबाबत पुणे भाजपचा एकही नेता ऑन कॅमेरा बोलायला तयार नाही. अगदी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीदेखील याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय. अजित पवार गटाला सोबत घेतल्याने एकटे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच विस्थापित होणार नाहीत तर ही यादी खूप लांबलचक असेल. पण तुर्तास आपण पुणे जिल्ह्यापुरतंच बोलुयात.