चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडे रोकड सापडली, कसब्यातही घंगेकरांचा भाजपवर आरोप (Video)

भाजपच्या तीन कार्यकर्त्यांकडे एक लाख ७० हजार रुपये रोख आणि कमळ चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडे रोकड सापडली, कसब्यातही घंगेकरांचा भाजपवर आरोप (Video)

पिंपरी - चिंचवड परिसरातील रहाटणी परिसरात रात्री दहाच्या सुमारास शिवराज कॉलणी येथील तांबे शाळेजवळ भाजपच्या तीन कार्यकर्त्यांकडे एक लाख ७० हजार रुपये रोख आणि कमळ चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक विभाग भरारी पथक प्रमुख विकास वारभुवन यांनी फिर्यादी दिली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माधव मल्लिकार्जुन मनोरे (वय ५१, रा. मथुरा कॉलनी, रहाटणी), स्वप्नील सुरेश फुगे, (वय ३५, रा. फुगेवाडी), कृष्णा बालाजी माने (वय २४, रा. फुगेवाडी) यांच्या कडे एक लाख ७० हजार रोकड, कमळ चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला असून मतदारांपर्यंत हे पैसे पोहचण्याचा कार्यकर्त्यांचा उद्देश होता का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या व्हिडिओमध्ये मतदारांच्या चिठ्ठ्या, मतदारांची नावे, प्रभाग क्र असे सर्व आढळून आले आहे.

दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणे शहर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरच कसबा गणपती मंदिर बाहेर तीन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू होते.पोलिस अधिकार्‍यांनी संबधित व्यक्ती विरोधात कारवाईच आश्वासन दिल्यानंतर रविंद्र धंगेकरनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.मात्र आमचा कायदेशीर मार्गाने लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

घंगेकर म्हणाले की, पोलिसांना सोबत घेऊन पैशांचा सर्वत्र वाटप सुरू असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना आज मी जवळपास तीन तासापासून ठिय्या आंदोलन केले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुक आयोगाच्या नियमानुसार मी काल पाच वाजेपर्यंत प्रचार केला आहे. मात्र या मतदारसंघात काल पासून भाजपकडून दहशतीच वातावरण निर्माण करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रात्री ८ वाजेपर्यंत मतदारसंघात प्रचार करीत होते. हे सर्व पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती होते. ही सर्व यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करीत आहे. ही बाब निषेधार्ह असून याचा धडा कसबा मतदारसंघातील जनता भाजपाला शिकवेल, असा विश्वास घंगेकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता होत असतानाच निवडणूक विभागाच्या स्थिर संनियंत्रण पथकाने दळवीनगरमधील भाजीमंडई परिसरात एका वाहनातून सुमारे १४ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेली रोकड आयकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी ४३ लाखांची रोकड जप्त केली होती.

तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली आहे. नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

https://twitter.com/i/status/1629385326560169986