ऑनर किलिंग रोखण्यासाठी आयुक्तस्तरावर विशेष कक्ष स्थापन करणार

लवकरच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये ऑनर किलिंग विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. ऑनर किलिंग संदर्भात शक्ती वाहिनी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ऑनर किलिंग रोखण्यासाठी आयुक्तस्तरावर विशेष कक्ष स्थापन करणार

पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याचा आदेश गृह विभागाने दिला

मुंबई - ऑनर किलिंगच्या घटनांमुळे राज्यात आज पर्यंत अनेक वेळा खळबळ उडाली आहे. गृह विभागाने आता या ऑनर किलिंगच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व शहरांच्या पोलीस प्रमुखांना स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पोलीस आयुक्त स्तरावर विशेष कक्ष स्थापन करून तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याच समजत आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर लवकरच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये ऑनर किलिंग विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. ऑनर किलिंग संदर्भात शक्ती वाहिनी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाने यावर आदेश पारित केले असून त्यानुसार गृह विभागाने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची छळवणूक आणि धमकावल्याच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याबाबत परिपत्रक जारी केल आहे.

पोलिसांनी हद्दीत घडलेल्या ‘ऑनर किलिंग’सारख्या घटनांचा मागील पाच वर्षांचा आढावा घेण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे; तसेच हद्दीत होणाऱ्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहास विरोध केला जात असेल, तर त्याबाबत जागरूक राहुन प्रभारी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती द्यावी. पोलिस आयुक्तालयस्तरावर पोलिस उपायुक्त यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहास विरोध करणाऱ्या नातेवाइकांना भेटावे.

त्यांची समजूत घालून विरोध करण्यापासून परावृत्त करावे. वेळ पडल्यास दोन्ही कुटुंबीयांना एकत्रित येण्यापासून प्रतिबंध करावे. त्यासाठी योग्य पोलिस बंदोबस्त नेमण्यात यावा; तसेच सहायक आयुक्त हे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहास विरोध करणाऱ्या समाजाचे प्रबोधन करतील, असेही परिपत्रकात म्हटले आहे. विवाहास विरोध केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत समज देण्यात येईल. ही चर्चा सुरू असताना सहायक आयुक्तांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे अपेक्षित असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.

पोलिसांनी हद्दीत घडलेल्या ‘ऑनर किलिंग’सारख्या घटनांचा मागील पाच वर्षांचा आढावा घेण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे; तसेच हद्दीत होणाऱ्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहास विरोध केला जात असेल, तर त्याबाबत जागरूक राहुन प्रभारी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती द्यावी. पोलिस आयुक्तालयस्तरावर पोलिस उपायुक्त यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहास विरोध करणाऱ्या नातेवाइकांना भेटावे. त्यांची समजूत घालून विरोध करण्यापासून परावृत्त करावे.

वेळ पडल्यास दोन्ही कुटुंबीयांना एकत्रित येण्यापासून प्रतिबंध करावे. त्यासाठी योग्य पोलिस बंदोबस्त नेमण्यात यावा; तसेच सहायक आयुक्त हे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहास विरोध करणाऱ्या समाजाचे प्रबोधन करतील, असेही परिपत्रकात म्हटले आहे. विवाहास विरोध केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत समज देण्यात येईल. ही चर्चा सुरू असताना सहायक आयुक्तांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे अपेक्षित असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.