इटलीत संस्कृत श्लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

इटलीत संस्कृत श्लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत


रोम -चार दिवसांच्या परदेश दौऱयावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी इटलीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी राजधानी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळय़ाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी त्यांचे भारतीय समुदायाने संस्कृत श्लोकांनी स्वागत केले. येथे ते जी-20 शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. ‘जी-20’ शिखर परिषदेच्या निमित्ताने मोदी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांची स्वतंत्रपणे भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच इटली दौऱयादरम्यान ख्रिश्चनांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीलाही जाणार आहेत.

इटली दौऱयानंतर पंतप्रधान ब्रिटन ग्लासगो (स्कॉटलंड) येथे पोहोचतील. येथे ते सीओपी-26 क्लायमेट चेंज समिटमध्ये सहभागी होणार आहेत. तरीही ‘वर्ल्ड इकॉनॉमिक इंजिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया जी-20 परिषदेतील त्यांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. ‘जी-20’ गटाची ही आठवी बैठक असेल. ‘लोक, ग्रह, समृद्धी’ ही यावषीची थीम असली तरी कोरोना संसर्गापासूनची मुक्ती आणि हवामान बदल या मुद्दय़ांवरही चर्चा होणार आहे. याचदरम्यान मोदी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचीही भेट घेऊ शकतात, असे मानले जात आहे.

इटली दौऱयादरम्यान पंतप्रधान कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनाही भेटू शकतात. तथापि, ही बैठक त्यांच्या वेळापत्रकाचा भाग नाही किंवा परराष्ट्र मंत्रालयाने औपचारिकपणे याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. रोमच्या मध्यभागी असलेल्या आणि वेगळय़ा देशाचा दर्जा असलेल्या या बैठकीसाठी पंतप्रधान व्हॅटिकन सिटीला जाऊ शकतात.

कोविड काळातील तिसरा विदेश दौरा

पंतप्रधान 31 ऑक्टोबरला इटलीहून ब्रिटनला पोहोचतील. येथे ते ग्लास्गो, स्कॉटलंड येथे होणाऱया क्लायमेट चेंज समिटमध्ये भाग घेतील. हवामान बदलावरील ही 26 वी शिखर परिषद असेल. हे इटली आणि ब्रिटनने संयुक्तपणे आयोजित केले आहे. या परिषदेत 120 देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांचा या वर्षातील हा तिसरा परदेश दौरा आहे. मार्चमध्ये ते बांगलादेशला गेले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ‘युएनजीए’च्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने अमेरिकेत तर आता ते इटली आणि ब्रिटनला जाणार आहेत.