शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल
पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह लष्कर, खडकी भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज (शुक्रवारी) शहरातील मध्यवर्ती भागासह लष्कर, खडकी भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे. मुख्य मिरवणूक भवानी माता मंदिरापासून सुरू होऊन भवानी पेठमार्गे रामोशी गेट चौक, नेहरू रोडने हमजेखान चौकापासून पुढे सोन्या मारुती चौक, फडके हौद चौकापासून लालमहल चौक येथे विसर्जित होईल. त्यामुळे नेहरू रोडवरील वाहतूक बंद केली जाणार आहे. वाहनाचलकांनी पॉवर हाउसकडून सेव्हन लव्ह्ज चौकाकडे जाणाऱ्यानी क्वार्टर गेट चौकातून इच्छितस्थळी जावे.
लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणाऱ्यानी नेहरू रोड, पॉवर हाउस चौकातून जिजामाता चौकमार्गे पुढे जावे. तर, देवजी बाबा चौकाकडून मीठगंज चौकमार्गे स्वारगेट कडे जाणाऱ्यांनी देवजीबाबा चौक ते दारूवाला पुलापासून पॉवर हाउस चौकातून नेहरू रोडचा वापर करावा. गणेश रोडवरील वाहने आवश्यकतेनुसार शिवाजी रोडमार्गे गाडगीळ पुतळा-बुधवार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. मिरवणूक फडके हौद चौकातून पुढे जाईपर्यंत केळकर रोडने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिरमार्गे येणारी वाहने आवश्यकतेनुसार अप्पा बळवंत चौकातून वळून बाजीराव रोड, शिवाजी रोड मार्गे इच्छितस्थळी जातील. शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून टिळक रोडने इच्छितस्थळी जावे. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनाकडे जाणारी वाहने जंगली महाराज रोडने जातील.
खडकी बाजार येथील शिवाजी पुतळा येथून सुरू झालेली मिरवणूक कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल चौक, तालीम चौकापासून पुढे महाराष्ट्र बँक मार्गे शिवाजी पुतळा येथे विसर्जित होणार आहे. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.