"लिखे जो खत तुझे"... सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमची अनोखी मोहीम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

"लिखे जो खत तुझे"... सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमची अनोखी मोहीम

पुणे, दि. 10 मे - पुण्याच्या प्रत्येक नगरसेवकाला (१३ मार्च २०२२ पर्यंत असलेले) आणि पुण्यातील काही विचारवंतांना एक साधा प्रश्न विचारण्यासाठी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमचे हे पत्र !

नागरिकांच्या पैशातून उभ्या राहिलेल्या व ४० वर्ष सिटीझन- प्रोटेस्ट करून जी वास्तू/जागा मिळवली त्याला कुठल्याहि व्यक्तीचे नाव देऊ नये असे सॅलिसबरी पार्कच्या रहिवाशांना वाटते. नागरिकांनी भीमाले यांच्यासोबत बैठक घेऊन सांगितले की, हा उद्यानाचा मुद्दा मागील ४० वर्षांपासून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे या उद्यानाला खासगी व्यक्तीचे नाव द्यावयाचे नाही, त्यावर भिमाले यांनी उद्यानाला कुणाचेही नाव न देण्याबाबत नागरिकांना होकरही दर्शवला होता.

पुण्याच्या कोणत्याही सार्वजनिक उद्यानाला फक्त राष्ट्रीय नेते आणि दिग्गज पर्यावरणवाद्यांची नावे द्यावीत असे स्पष्टपणे PMC च्या २७ जुलै २००० च्या GR  मध्ये नमूद केले आहे, तरीही तुमचे सहकारी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आधीचा मूळ फलक बदलून त्यांच्या वडिलांचे नाव नवीन गार्डनला दिले. ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर?

सॅलिसबरी पार्कच्या रहिवाशांनी भिमाले यांनी लावलेला बेकायदेशीर व अनैतिक फलक उतरविण्यासाठी जे आंदोलन सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमने सुरु केले आहे त्यात तुम्ही आमच्या सोबत आहात का?

कृपया टिक करा - "हो किंवा नाही"

तुमची उत्तरे २२ मे पर्यंत आम्हाला खालील दिलेल्या ई-मेल id वर पाठवा.

सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरम, पुणे – 411037

दिनांक : रविवार १५ मे

वेळ : सायंकाळी ६ ते ७  

स्थळ : नवीन सॅलिसबरी पार्क गार्डन, सॅलिसबरी पार्क

उपक्रम : पत्र सह्या करून स्पीड-पोस्टसाठी तयार ठेवणे

जास्तीत जास्त लोकांनी ह्या अद्वितीय उपक्रमात भाग घ्यावा

तुमच्या उपस्थिती आणि मदतीमुळे आमचा हुरूप अधिक वाढेल !

असे सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.