पुण्यात तीन वर्षाच्या चिमुरडीची आईनेच केली गळा आवळून हत्या
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीची आईनेच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे - अनैतिक संबंधातून पोटच्या तीन वर्षाच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खडकी रेल्वे स्थानकाजवळील सीएफडी मैदानाजवळ पोलिसांना गुरूवारी तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांना अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील चौकशीला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष देवमन जामनिक (वय 25) आणि लक्ष्मी संतोष गवई (वय 26, दोघे रा. खेरपुडी, ता. बाळापूर, जि. अकोला) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. खडकी पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती.
आरोपी एकाच गावातील रहिवाशी असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघांनी गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १ मार्च २०२३ रोजी गावातून निघाले. त्यावेळी लक्ष्मीने तिची तीन वर्षाच्या मुलीलाही सोबत घेतले. त्यावरून संतोष आणि लक्ष्मी यांच्यात वाद झाला. त्यानंतर लक्ष्मीने प्रियकर संतोषच्या मदतीने पोटच्या तीन वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. तसेच तिचा मृतदेह सीएफडी मैदानाजवळ फेकून दोघांनी पळ काढला.
या सगळ्या प्रकाराचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावर आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं. आरोपीने घातलेल्या जॅकेटवर संघर्ष ग्रुप, खेरपुडी असं लिहिलं होतं. त्यावरुन शोध घेताना ते गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती काढली. गावातील नागरिकांशी संपर्क केला असता दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला आणि दोघांना ताब्यात घेतलं.