सत्तेसाठी हपापलेल्या भाजपकडून गजानन चिंचवडे यांच्या अंत्यविधीपूर्वीच मृत्यूचे राजकारण - योगेश बहल 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सत्तेसाठी हपापलेल्या भाजपकडून गजानन चिंचवडे यांच्या अंत्यविधीपूर्वीच मृत्यूचे राजकारण - योगेश बहल 

पिंपरी- 

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय क्षेत्रातील एका कष्टाळू आणि सामाजिक भान असलेल्या राजकीय व्यक्तीमत्त्वाचे दुख:द निधन झालेले असतानाच तसेच त्यांचा अंत्यविधी होण्याच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाने स्वत:चे पाप झाकण्यासाठी त्यांच्या मृत्यूचे राजकारण करणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार आहे. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासाठी राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता अथवा महाविकास आघाडी सरकारमधील कोणाचाही संबंध नसल्याचे उत्तर राष्ट्रवादीचे माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शनिवारी (दि. 5) दिले.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेत भाजपाचे माजी खासदार अमर साबळे, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके व भाजपाच्या इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेत चिंचवडे यांच्या मृत्यूस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या आरोपाबाबत खेद व्यक्त करत योगेश बहल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.

योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गजानन चिंचवडे हे सामाजिक क्षेत्राची भान असलेले व सर्वसमान्यांच्या सुख- दुखा:त नेहमीच सहभागी होणारे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाचे दुख: सर्वांनाच झाले आहे. त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो जमिनीच्या वादातून झाला होता. त्याच्याशी राष्ट्रवादीचा अथवा महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. चिंचवडे यांचे निधन होऊन काही तासही उलटले नाहीत, तोच भाजपाने या प्रकरणाचे राजकारण करणे ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. चिंचवडे कुटुंबीय हे भाजपामध्ये काही महिन्यांपूर्वीच आले होते. दुख:च्या या क्षणी त्यांच्या आप्तजनांना सावरणे, आधार देणे सोडून केवळ राजकारण करण्यासाठी आणि आपले पाप झाकण्यासाठी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केले त्याचा आम्ही निषेध करतो.

भाजपाची मंडळी निव्वळ तथ्यहिन आरोप करत आहेत. सत्ता आणि राजकारण हे नेहमीच सुरू असते. मात्र, दुख:द प्रसंगी भाजपाच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण न करता चिंचवडे कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असताना नको ते उद्योग करू नयेत तसेच नाहक राष्ट्रवादीची व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करू नये. गजानन चिंचवडे यांचे निधन ही मनाला वेदना देणारी घटना असून या प्रसंगी चिंचवडे कुटुंबियांच्या पाठिशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे योगेश बहल यांनी म्हटले आहे.