भाजपचे ५० आमदार संपर्कात, संजय राऊतांचा दानवेंना प्रतिटोला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. १९ मार्च - भारतीय जनता पक्षाचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, भाजपचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटलं तर ? नव्हे संपर्कात आहेच असा प्रतिटोला त्यांनी लगावला आहे. एकूणच होळीनंतर राजकीय धुळवड जोमाने सुरू झाली आहे असंच म्हणावं लागेल.
पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले होते की, जेव्हा शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरव्याचं पांघरूण घेतलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज असून, ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर हे २५ आमदार बहिष्कार घालणार होते, पण त्यांची शिवसेना नेत्यांनी समजूत काढली. परंतु निवडणुका जवळ आल्यावर नाराज आमदार भाजपमध्ये येतील, असाही दावाही दानवे यांनी केला होता.
दानवेंच्या या दाव्यावर संतप्त झालेल्या राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दानवे कोणत्या तरी नशेत बोलले असावेत. कदाचित त्यांना १२५ म्हणायचं असेल पण चुकून ते २५ म्हणाले असावेत. दानवेंना काल आपण काय म्हणालो ते आज आठवणार नाही. जर २५ आमदार संपर्कात असतील तर घ्या ना, थांबलात कशाला ? आम्हीही म्हणतो भाजपचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत.
दरम्यान, एमआयएमनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीत येण्यास तयार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, औरंगजेबापुढे नतमस्तक होणाऱ्यांना मविआमध्ये स्थान मिळणार नाही. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांच्यामुळे उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा झाला आहे. त्यांच्याशी युती कदापिही शक्य नाही.
राऊतांच्या या प्रतिक्रियेमुळे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनीही प्रतिवार केला आहे. ते म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा सर्व मुस्लीम समाज शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे विसरून जा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी करता. औरंगजेब कोणत्या काळात होते आणि आजचा काळ काय आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं”, असं जलील म्हणाले आहेत.
ज्या शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधात झाला होता, ती शिवसेना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पुन्हा त्यांच्यासोबतच जाऊ शकते, तर तुम्ही किती खालच्या पातळीवर गेला आहात, हे दिसतंय. तुम्ही आम्हाला असा उपदेश देणार असाल, तर लोकांनाही कळालं आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आम्ही छत्रपतींच्या नावाचा वापर कधीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेला नाही”, असं देखील जलील म्हणाले.
वास्तविक पाहता एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याची ऑफर दिली होती. यावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया येण्याऐवजी शिवसेनेनं ही ऑफर धुडकावून लावली आहे. कोण कोणाचा प्रवक्ता आहे हेच कळेनासे झाले आहे, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. संजय राऊत आणि भाजप यांच्यात शाब्दिक लढाई सुरू असताना आता एमआयएमनंही त्यात उडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच काय तर होळीनंतरची राजकीय धुळवड चांगलीच रंगताना पाहायला मिळत आहे. ती अधिकच गडद होत जाणार यात शंका नाही.