कोर्टाच्या निर्णयाआधी आयोगाचा निर्णय नको – उद्धव ठाकरे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई (प्रबोधन न्यूज) – आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे हे पोटनिवडणूक किंवा अदानी प्रकरणावर बोलतील असा अंदाज होता. मात्र, तो सपशेल फोल ठरला. त्यांनी शिवसेनेच्या भवितव्याविषयी सध्या निर्माण झालेल्या संभ्रमावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाकडे आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. "सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्याशिवाय निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विधिमंडळ, संसद आणि रस्त्यावरचा असे पक्षाचे तीन प्रकार सांगितले. तसेच, दुसरी शिवसेना मी मानत नाही, एकच शिवसेना आहे, असं मी मानतो असंही ते म्हणाले.
“गेले सहा-सात महिने शिवसेनेचं काय होणार? पक्षनाव, चिन्ह मिळणार की नाही? पाठित खंजीर खुपसणाऱ्यांचं काय होणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. शिवसेनेनं आमच्याकडून आमचं म्हणणं लिखित स्वरूपात सादर केलं आहे. नेमकं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पण कुठलाही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. शिवसेना त्याच प्रमाणे १९६६ साली स्थापन झाली आहे. केवळ निवडून आलेल्या लोकांच्या बळावर पक्ष स्थापन होत असेल तर त्याला पक्ष म्हणत नाहीत, ती गद्दारी असते. जगातील दोन किंवा तीन नंबरचे उद्योगपती आणि पैसेवाले पक्ष स्थापन करतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणं आहे. त्यानुसार सर्व नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. आताही निवडणूक आयोगानं जे काही कागदोपत्री पुरावे मागवले होते, ते आम्ही दिले आहेत. काही लाखांच्या घरात आमची सदस्यसंख्या आहे. त्याचीही प्रतिज्ञापत्रं सादर केली आहेत. त्यामुळं आमचं पारडं जड आहे. शिवसेनेला कुठलाही धोका नाही. शिवसेना ही एकच आहे आणि राहील. दुसरी शिवसेना आम्ही मानतच नाही,’ असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
"गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणाचा, नीचपणाचा आहे," असे ठाकरेंना यांनी शिंदे गटाला सुनावलयं. "शिंदे गटालाच घटनाच नाही, शिंदे गटाचं 'मुख्यनेता' हे पद शिवसेनेत नाही," असे ठाकरे यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नाही. आयोग कोणत्याही क्षणी निकाल जाहीर करू शकतात. तो निकाल कुणाच्या बाजूने लागेल हा भाग वेगळा. पण हे अपात्र ठरले, तर मग काय होणार? असे म्हणत त्यांनी मोदी व भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
“यावेळची निवडणूक २३ जानेवारीला होणं अपेक्षित होतं. ती निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केली आहे. एकतर ही निवडणूक आम्हाला घेण्याची परवानगी द्या. नाहीतर जे आहे तसंच चालू ठेवा. आयोगाकडून अजून तसं काही उत्तर आलेलं नाही. आयोगाच्या परवानगीनंतर रीतसर निवडणूक होईल. या घटनेनुसारच शिवसेनेतील पदांचा उल्लेख केला आहे”, असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
काही घटनातज्ज्ञांच्या मते अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा. जर ते अपात्र होणार असतील तर मग त्यांचा हा दावा निवडणूक आयोग कसा गृहीत धरू शकतं? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आयोगाचा निकाल लागू नये, असं आमचं मत आहे”, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडली.