छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक – आ. रोहित पवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक – आ. रोहित पवार

मुंबई (प्रबोधन न्यूज) - 'सिस्टर सिटी' मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन होजे शहराला दिलेला आणि तेथील उद्यानात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे. अशा भावना आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत.

यासोबतच त्यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती देखील केली आहे. छत्रपतींचा पुतळा चोरी झाल्याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे. उद्यानातील हा पुतळा चोरी झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केली असू पोलिसांनी स्थानिक नागरिकांचे सहकार्य देखील मागितले आहे.

पुणे शहराकडून अमेरीकेतील सॅन जोसे शहराला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. सॅन जोसे शहराला पुण्याची सिस्टर सिटी म्हणून हा पुतळा देण्यात आला होता. या दोन्ही शहरांमधील अनेक बाबतीत साधर्म्य असून दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आहे.

दरम्यान उत्तर अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे सॅन जोसे शहरातील नागरिकांना खूप दुःख झाले असून या घटनेबाबतच्या अपडेट लवकरच दिल्या जातील, असेही उद्यान विभागाने केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

कॅलिफोर्नियातील सॅन होसे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आले आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन होसे येथील ‘गुडलपे रिव्हर पार्क’ (Guadalupe River Park) या उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा होता.

या चोरीनंतर सॅन जोसच्या उद्यान विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहेत.