माजी मंत्री रमेश बागवे चिरंजीवासह भाजपमध्ये प्रवेश करणार ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

माजी मंत्री रमेश बागवे चिरंजीवासह भाजपमध्ये प्रवेश करणार ?

पुणे (प्रबोधन न्यूज) - काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अविनाश बागवे दोघे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसपुढे बंडखोरांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, धंगेकर यांच्या उमेदवारीवरुन पक्षातील अंतर्गत धूसफूस बाहेर आली आहे. यामुळे काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील १९ नगरसेवक भाजपात प्रवेश करणार ?

कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळीक यांनी महाविकास आघाडीमधील १९ नगरसेवक भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहे असा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुळीक म्हणाले की, महाविकास आघाडीमधील १९ नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहे. कारण आता आघाडीच्या हाती काही नाही याची जाणीव नगरसेवकांना आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज लागत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यास ते इच्छुक आहेत, त्यामुळेच त्यांचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असंही जगदीश मुळीक म्हणाले.