जितेंद्र आव्हाडांची जीभ कापून आणणाऱ्याला भाजप ओबीसी युवा मोर्चाकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जितेंद्र आव्हाडांची जीभ कापून आणणाऱ्याला भाजप ओबीसी युवा मोर्चाकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर

जालना, (प्रबोधन न्यूज) - राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद उफाळून आलाय. शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात काही ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात येत आहे. अशातच जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास १० लाखांच्या बक्षीसाची घोषणाही करण्यात आली आहे.

जालन्यात तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजप ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड जिथे दिसतील, तिथे त्यांची जीभ झाटावी. जो जीभ झाटेल त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी आपण ते विधान कोणत्या संदर्भाने केलं हे स्पष्ट करूनही त्यांच्याविरोधात टीका होताना दिसत आहे.

तसेच, भाजप युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरही मोर्चा काढला होता; परंतु पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली असून जळगावमध्ये आमदार सुरेश चव्हाण हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे. केवळ मत मागण्यासाठी राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरात असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. भविष्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे असे वक्तव्य राहिल्यास रोडवर चपला मारल्याशिवाय पर्याय नसल्याचा इशाराही भोळे यांनी दिला.