काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
कोल्हापूर, दि. १६ एप्रिल – कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तथा महा विकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत मतांनी विजय झाला आहे. जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यावर १९ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ तर कदम यांना ७७ हजार ४२६ मते पडली आहेत. भाजपने व महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.
कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार तसेच नगरसेवक असताना महापौर होण्याचा असा दुहेरी मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. विजयानंतर जयश्री जाधव म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि माझ्या जनतेला माझ्या विजयाचे श्रेय देईन. जनतेने भरभरून मते दिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमान जनतेने न्याय दिला आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक पार पडली आहे. प्रचारासाठी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. भाजपने ही निवडणूक 'हिंदूत्वा'च्या मुद्यावर केली असल्याचे चित्र आहे. हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने शिवसेनेचा मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश मिळू शकले नाही.