ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल यात्रेत मंचर येथे नेत्यांची आपापसात हाणामारी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल यात्रेत मंचर येथे नेत्यांची आपापसात हाणामारी

मंचर, (प्रबोधन न्यूज) - नवे निवडणूक चिन्ह मशाल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे राज्यभरात ठिकठिकाणी मशालींसह यात्रा काढण्यात येत आहेत. मात्र, मंचर येथे ही मशाल हातात घेण्यावरुन दोन नेत्यांमध्ये मशाल यात्रेतच फ्री-स्टाइल हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

मशाल पेटवत पुण्यातील शिवसेना (उद्धव बाळाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरी ते मातोश्रीपर्यंत मशाल यात्रा काढली होती. मंचर येथे ही यात्रा दाखल झाली तेव्हा मशाल हातात घेण्यासाठी मंचरचे माजी सरपंच दत्ता गंजाळे पुढे आले. मात्र, यावेळी जिल्हा संघटक तथा माजी पंचायत समिती सदस्य राजा बाणखेले यांनी गंजाळे यांना रोखले. या कारणामुळे दोघांमध्ये चांगलीच फ्रीस्टाईल हाणामारी झाली.

गंजाळेंना उद्देशून बाणखेले म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेल्यांनाच मशालीचे स्वागत करण्याचा अधिकार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या व्यासपीठावर असणाऱ्यांचे येथे काय काम? बाणखेले यांच्या या वक्तव्यावर गंजाळे भडकले. आपण शिंदे गट आणि भाजपच्या व्यासपीठात गेलोच नाही, असे म्हणत ते गंजाळेंच्या अंगावर धावून गेले. बाणखेले यांनीही जशात तसे प्रत्युत्तर दिल्याने दोघांमध्ये यात्रेतच फ्री-स्टाइल हाणामारी झाली.

नंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी दोघांना रोखले व एकमेकांपासून दूर नेले. त्यानंतर यात्रा पुढे गेली. मात्र हाणामारीचा व्हिडिओ एका कार्यकर्त्याने व्हायरल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.