दोन नवीन अतिउच्चदाब उपकेद्रांना महावितरणची मंजूरी पिंपरी चिंचवड शहर, भोसरी, चिंचवड एमआयडीसी, आळंदी, धानोरी, लोहेगावसह २० गावांना फायदा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दोन नवीन अतिउच्चदाब उपकेद्रांना महावितरणची मंजूरी पिंपरी चिंचवड शहर, भोसरी, चिंचवड एमआयडीसी, आळंदी, धानोरी, लोहेगावसह २० गावांना फायदा

पुणे, (प्रबोधन न्यूज )  -  दिवसेंदिवस विजेची व नवीन वीजजोडण्यांची वाढती मागणी तसेच सद्यस्थितीत असलेल्या वीजयंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी प्रस्तावित चऱ्होली येथील २२०/३३/२२ केव्ही प्राईड वर्ल्ड सिटी, मोशी येथील २२०/२२ केव्ही सफारी पार्क हे दोन नवीन अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच भोसरी येथील २२०/२२ केव्ही सेन्चुरी एन्का उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास महावितरणकडून नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे.

या दोन नवीन अतिउच्चदाब उपकेंद्रांमुळे व एका उपकेंद्राच्या क्षमतावाढीमुळे महापारेषणच्या भोसरी आरएस २२०/२२ केव्ही एक आणि दोन, टेल्को २२०/२२ केव्ही, मरकळ १३२/३३/२२ केव्ही तसेच सेन्चुरी एन्का २२०/२२ केव्ही या पाच अतिउच्चदाब उपकेंद्रावरील वीजभार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्राईड वर्ल्ड सिटी (चऱ्होली) व सफारी पार्क (मोशी) येथील नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास व सेन्चुरी एन्का (भोसरी) उपकेंद्रांच्या क्षमतावाढीच्या प्रस्तावास नुकतीच मंजूरी दिली आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव महावितरणकडून महापारेषणकडे पाठविण्यात आला आहे. नवीन उपकेंद्र उभारणे व क्षमतावाढ आदींचे कामे महापारेषणकडून करण्यात येणार आहे.

दोन नवीन २२० केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाब उपकेंद्र व एका उपकेंद्राची १०० एमव्हीएने क्षमतावाढ यामुळे पिंपरी चिंचवड शहरासह भोसरी व चिंचवड एमआयडीसी परिसर, चऱ्होली, प्राईड वर्ल्ड सिटी, दाभाडेवस्ती, लोहेगाव, धानोरी, मोशी, आळंदी, जाधववाडी, शिवाजीवाडी, तुपेवस्ती, चिंबळी, केळगाव, डुडळगाव, चोवीसवाडी, वडमुखवाडी, बोऱ्हाडेवाडी यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा केंद्र, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचरा डेपो आदींना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या तांत्रिक प्रमाणात घट होईल तसेच काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास सक्षम पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे. तसेच वीजहानीमध्ये देखील घट होणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या महापारेषण कंपनीच्या भोसरी आरएस एक व दोन तसेच मरकळ, टेल्को व सेन्चुरी एन्का या पाच अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या ३३ केव्ही व २२ केव्ही क्षमतेच्या एकूण ६६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा केला जातो. या सर्व वाहिन्यांचे विभाजन व लांबी कमी करून त्याचा वीजभार नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्राईड वर्ल्ड सिटी व सफारी पार्क २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रावर आणि क्षमतावाढ होणाऱ्या सेन्चुरी एन्का उपकेंद्रावर देण्यात येणार आहे.