टपाल विभाग होणार हायटेक; ड्रोनद्वारे होणार पत्रांची डिलिव्हरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
दुर्गम भागात होणार उपयोग
नागपूर, (प्रबोधन न्यूज) - देशाच्या कानाकोपऱ्यात टपाल सेवा पोहचवण्याचा दावा करणाऱ्या टपाल विभाग आत्ता आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. नागपूर टपाल विभागाल ड्रोनचा वापर कसा करता येईल याची चाचपणी करण्यासंदर्भातील पत्र केंद्रीय विभागाकडून प्राप्त झाले आहे.
सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कामे जलद गतीने व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. त्यात टपाल विभागाने देखील पुढाकार घेतला आहे. टपाल विभागाद्वारे ड्रोनचा वापर सुरू झाल्यास शहरी भागासह दुर्गम भागातील सर्वसामान्यांपर्यंत टपाल आणि इतर सेवेचा लाभ मिळू शकणार आहे. महाराष्ट्र सर्कलला 2021-22 चा सर्वोत्कृष्ट पोस्टल क्षेत्र म्हणून गौरविले आहे. याच साली नागपूर टपाल विभागात ९५.५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विभागाचा आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफर, रोख प्रमाणपत्र इत्यादीकडे वाढता कल असल्याचे सांगितले जात आहे.
गडचिरोली जिल्हातील तेंदूपत्ता, महुआ, मध, हिरडा यासारख्या लघु वन उत्पादकांच्या प्रचारासाठी टपाल विभाग विशेष उपक्रम राबविणार आहे. टपाल विभागाद्वारे या उत्पादकांचा विशेष लिफाफा प्रकाशित केला जाईल. वनविभागाच्या साहाय्याने हा उपक्रम राबविला जात असल्याचे नागपूर विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांनी सांगितले.
नागपूर टपाल विभागाच्या ही महत्त्वपूर्ण सेवा सुरू झाल्यास त्याचा फायदा लोकांना होईल. नागपूर टपाल विभागाल ड्रोनचा वापर कसा करता येईल याची चाचपणी करण्यासंदर्भातील पत्र केंद्रीय विभागाकडून प्राप्त झाले आहे. येणाऱ्या काही महिन्यात यासंबंधीचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांनी दिली.