जॅकलीनला ईडीकडून पुन्हा समन्स, आठ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

जॅकलीनला ईडीकडून पुन्हा समन्स, आठ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

मुंबई - 

200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. आठ डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठग सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यात जॅकलीनचंही नाव समोर आल्यानं जॅकलीनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.सुकेश चंद्रशेखरवर मनी लाँड्रिंग आणि इतर काही गंभीर आरोप आहेत. रविवारी जॅकलीनला मुंबई विमानतळावरही अडवण्यात आलं होतं. ईडीच्या लुकआऊट नोटीसीनंतरही जॅकलीन भारताबाहेर निघाली होती. त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं.

अलिकडेच जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पहायला मिळालं. त्या फोटोतून सुकेश आणि जॅकलीनमध्ये किती जवळीकता होती हे स्पष्ट होत आहे. तर सुकेश अनेकदा जॅकलीनला भेटला होता आणि त्याने जॅकलीनला महागडे गिफ्ट दिल्याचाही आरोप आहे. सुकेशने जॅकलीनला आतापर्यंत तब्बल 10 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याच्या चर्चा आहेत. त्यातल्या 52 लाखांच्या घोड्याची आणि 9 लाखाच्या मांजरीची जास्त चर्चा होत आहे.