राजस्थानमधील ५०० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये स्मृती इराणी करणार लेकीचं लग्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राजस्थानमधील ५०० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये स्मृती इराणी करणार लेकीचं लग्न
राजस्थानमधील ५०० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये स्मृती इराणी करणार लेकीचं लग्न
राजस्थानमधील ५०० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये स्मृती इराणी करणार लेकीचं लग्न
राजस्थानमधील ५०० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये स्मृती इराणी करणार लेकीचं लग्न

७१ खोल्या, ४ रेस्टॉरंट, १८ टेन्ट, स्विमिंग पूल, जिम, स्पाही इथे उपलब्ध आहे.

नवी दिल्ली (वृत्तसेवा) - भाजपच्या खासदार स्मृती इराणी यांच्या मोठ्या मुलीचे लग्न ठरले आहे. सध्या स्मृती इराणी त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. शनैल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शनेलचं लग्न आणि त्याचदरम्यानचे कार्यक्रम ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. यासाठी स्मृती इराणी अगदी जोरदार तयारी करत आहेत. लेकीच्या लग्नासाठी त्यांनी खास डेस्टिनेशन निवडलं आहे. ‘आजतक’च्या वृत्तानुसार स्मृती इराणी राजस्थान येथील खींवसर फोर्ट येथे लेकीचं लग्न करणार आहेत.

२०२१मध्ये शनेलचा अर्जुन भल्लाबरोबर साखरपुडा पार पडला. खींवसर फोर्टमध्येच अर्जुनने शनैलला लग्नाची मागणी घातली होती. आता याच ठिकाणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये खींवसर किल्ला आहे. ५०० वर्ष जुना हा किल्ला आहे. जोधपूर व नागौरच्या मध्यभागी हा किल्ला आहे.

या फोर्टमध्ये जवळपास ७१ खोल्या आहेत. तसेच या किल्ल्यामध्ये ४ रेस्टॉरंटही आहेत. १८ ऐसपैस टेन्ट या किल्ल्यामध्ये बांधण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर स्विमिंग पूल, जिम, स्पाही इथे उपलब्ध आहे. म्हणजेच अगदी शाही पद्धतीने स्मृती इराणींच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं दिसत आहे. शनैल ही वकील आहे. तिने मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून लॉ ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमधून एलएलएम पदवी पूर्ण केली.