शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरलं जातंय – शरद पवार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, दि. १ एप्रिल - देशात शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुरुवारी अल्पसंख्याक विभागाचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली. महागाईच्या मुद्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. देशात महागाईची एवढी मोठी समस्या असताना, काश्मीर फाईल या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगंडा राबविला जात आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. आज ज्याच्या हाती सत्ता आहे, तोच असा प्रचार करीत आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष पंतप्रधान मोदींवर टीका केली.