RSS चे केरळमधील पाच नेते ‘पीएफआय’च्या हिट लिस्टवर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
तिरूअनंतपुरम् (केरळ), (प्रबोधन वृत्तसेवा) – केंद्र सरकारकडून नुकतीच बंदी घालण्यात आलेल्या पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांना धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आरएसएसच्या केरळमधील पाच नेत्यांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर गृह मंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एनआयएने केरळमधील पीएफआयचा सदस्य मोहम्मद बशीर याच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी त्याच्या घरात आरएसएसच्या पाच नेत्यांची नावं सापडली होती.
मिळालेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केंद्रीय गृह मंत्रालयाला आरएसएस नेत्यांवरील संभाव्य धोक्याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ हा हल्ला होण्याची शक्यता असल्याचं एनआयएने सांगितलं आहे. या नेत्यांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे कमांडो तैनात केले जाणार आहेत. सुरक्षेसाठी एकूण ११ कमांडो तैनात असणार आहेत. यामधील सहा कमांडो खासगी सुरक्षेत असतील.
केंद्र सरकारने बुधवारी सुरक्षा आणि दहशतवादी संबंधांचा हवाला देत पीएफआय आणि त्याच्या संलग्न कंपन्यांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत एकूण नऊ संस्थांना "बेकायदेशीर" घोषित करण्यात आले आहे.