मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; डिव्हाईडरचा रॉड कारच्या आरपार घुसला (फोटो फिचर)
या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. डिव्हाईडरचा आख्खा रॉड कारच्यामधून आर-पार गेला. अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतून प्रवास करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल, असेच मनात येते. पण सुदैवाने तिघांच्या मधून डिव्हायडरचा रॉड आरपार गेला. या अपघातात एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे. त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात शनिवारी 18 मार्च साडे सातच्या सुमारास सोमाटणे फाट्यावर झाला. मुंबईवरुन सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट अशा पद्धतीने डिव्हाईडरमध्ये घुसली. या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, शुक्रवारी याच परिसरात कारने ट्रकला मागून धडक दिली होती. अर्धी कार ट्रकखाली अडकल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. उर्से टोलनाक्याजवळ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीने यातील वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.