गांधीनगर मधील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार

गांधीनगर मधील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार
गांधीनगर मधील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार

मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

पिंपरी-चिंचवड, दि. १६ एप्रिल – पिंपरी येथील गांधीनगरमधील श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी येथील प.पू.समर्थ सद्‌गुरु बालयोगी श्री सिध्देश्वर सिंग महाराज यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण समारंभ आणि श्री हनुमानाच्या मूर्तीची व श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

या वेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, निर्मला कदम तसेच तेलगू समाज संघटना श्री दुर्गामाता मित्र मंडळाचे अध्यक्ष बसवराज शेट्टी, ॲड. दत्ता झुळूक, दीपक म्हेत्रे, दत्ता वरली, रायप्पा भंडारी, व्यंकटेश म्हेत्रे, राजू तलवार, मरलींग भंडारी, शिवा उलेर, ओगलेश म्हेत्रे, नंदू शिंदे, नागराज भांडेकर, मनोज भांडेकर, मरलींग नाटेकर, मल्लेश म्हेत्रे, शिवाजी पवार, आयप्पा नाटेकर, चन्नाप्पा क-हे आदींसह गांधीनगर खराळवाडी मधिल भक्त भाविक उपस्थित होते.

शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या या धार्मिक उत्सवामध्ये श्री हनुमानाच्या मंदिराचा जिर्णोध्दार, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण, श्री सत्यनारायण महापूजा, दोन दिवस महाप्रसाद, होम - हवन असे कार्यक्रम झाले. शनिवारी पहाटे हनुमान जयंतीनिमित्त डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या दोन मजली मंदिराच्या तळमजल्यात श्री हनुमान मंदिर आणि वरच्या मजल्यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांसाठी वरच्या मजल्यावर एक हॉल उभारण्यात आला आहे अशी माहिती बसवराज शेट्टी यांनी दिली.