पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

इस्लामाबाद - क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच T20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण त्याआधीच पाकिस्तानच्या क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज क्रिकेटपटू शहजाद आझम राणा यांचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त आहे. शहजाद आझम राणा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे. एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला आहे.

शहजाद आझम राणा हा सियालकोटचा होता. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज होता. शहजादने पाकिस्तानमध्ये 95 प्रथम श्रेणी सामने खेळले. शहजादने पाकिस्तानमध्ये 95 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्याने 58 लिस्ट ए आणि 29 टी-20 सामनेही खेळले आहेत.

शहजाद आझम राणाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 496 विकेट घेतल्या. प्रथम श्रेणीत त्याने 388 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी त्याने लिस्ट ए मध्ये 81 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 27 विकेट घेतल्या. शहजाद पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसोबतही क्रिकेट खेळला होता.

2018 मध्ये शहजाद आझमने शेवटचा प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामना खेळला. गेल्या सामन्यात त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. त्याच वेळी, त्याने 2020 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला.