राज ठाकरे यांची लवकरच पुण्यात सभा होणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 16 मे - मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पु्ण्यातही सभा होणार आहे. अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर राज यांच्या सभेची तारीख निश्चित होईल. २१ मे किंवा २९ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे उद्या पुण्यात दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
पुणे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ संभाजी वावर यांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात यावी अशा स्वरुपाचं पत्र त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात ही सभा होणार असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची सभा निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सूचनेनुसार आम्ही सभेसाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे मैदान निवडले असल्याचं या पत्रकाद्वारे मांडण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. मनसेच्या कोअर कमिटीमधील काही नेत्यांकडून माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वसंत मोरे यांनी या सगळ्याची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. वसंत मोरेंना राज ठाकरेंनी फोन केला आहे आणि उद्या (मंगळवारी) सकाळी भेटीसाठी मोरेंना बोलावलं आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे हे वसंत मोरे आणि मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना नक्की काय आदेश देणार, हे पाहावे लागेल.