दिघीतील अत्यंत वर्दळीचा ममता स्वीटहोम चौक अखेर ‘कोंडीमुक्त’
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - दिघी आणि परिसरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या ममता स्वीटहोम चौकातील वाहतूक अखेर ‘कोंडीमुक्त’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यावर अडथळा ठरणारे महावितरण डीपी, धोकादायक पोल, स्मार्ट सिटी योजनेतील सीसीटीव्ही पोल यासह अनधिकृत शेड व्यावसायिक व प्रशासन यांच्या समन्वयातून हटवण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘‘वाहतूक कोंडीमुक्त भोसरी विधानसभा’’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत गेल्या आठवड्यात महापालिका, महावितरण, आरटीओ, वाहतूक पोलीस प्रशासन अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मतदार संघातील वाहतूक कोंडी होणारे ‘रेड स्पॉट’ निश्चित करण्यात आले. त्यानंतर विभागनिहाय ‘लाईन ऑफ ॲक्शन’ ठरवण्यात आली आहे.
दरम्यान, दिघी आणि परिसरातील हजारो नागरिकांची वर्दळ असणारा ममता स्वीटहोम चौक आणि तेथील वाहतूक कोंडी हा विषय कळीचा ठरला होता. महापालिका प्रशासनाने सर्वप्रथम या ठिकाणी मुख्य रस्त्यात आलेला स्मार्ट सिटी योजनेतील सीसीटीव्ही पोल, महावितरण धोकादायक पोल हटवला. त्यानंतर रस्त्याकडेला उभारण्यात आलेले बेकायदा शेडही संबंधित व्यावसायिकांना सांगून काढण्यात आले. त्यानंतर महावितरण प्रशासनाचा डीपी या ठिकाणी रस्त्यात अडथळा ठरत होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी सदर डीपी हटवला आहे. त्यामुळे रस्ता प्रशस्त झाला असून, वाहनचालक- नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दिघीतील ममता स्वीटहोम चौकात वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरण डीपी, धोकादायक पोल, सीसीटीव्ही पोल हटवण्यात आला. त्यामुळे पुणे-आळंदी रस्ता, भोसरी-आळंदी रस्ता आणि भोसरी-दिघी रस्ता जोडणाऱ्या या चौकातील वाहतूक कोंडी निश्चितपणे कमी होणार आहे. आगामी काळात दिघी गावाला बायपास मार्ग विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वाहतूक कोंडीचा ‘रेड स्पॉट’ कमी करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व प्रशासकीय विभागांचे आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारे भोसरी मतदार संघातील विविध गावांमध्ये असलेल्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
ममता स्वीटहोम चौकातील डीपी हटवल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. आमदार महेश लांडगे यांच्या बैठकीमुळे प्रशासनाने कार्यवाही केली. आता या ठिकाणी असलेले फेरीवाले, स्टॉलधारकांसाठी हॉकर्स झोन करावा. ज्यामुळे मुख्य चौकात वाहतुकीला अडथळा होणार नाही. तसेच, सीएमई सीमाभिंतीलगत असलेल्या दिघी बायपास रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सदर काम मार्गी लावले, तर वाहतूक सुरळीत होण्यास आणखी बळ मिळणार आहे.
- संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, दिघी.