भाजप नेते संजय काकडे यांना न्यायालयाचा दणका; मिळकतीचे जप्तीचे आदेश

बंगला प्रतिनिधिक स्वरूपात ताब्यात घ्यावा आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याची विक्री करण्यासंदर्भात सूचित केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

भाजप नेते संजय काकडे यांना न्यायालयाचा दणका; मिळकतीचे जप्तीचे आदेश

मुंबई - माजी खासदार आणि भाजप नेते संजय काकडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जोरदार झटका देण्यात आला आहे. डीएचएफएल बँकेचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणामध्ये शिवाजी गृहरचना सहकारी संस्था येथील सर्वे नंबर १०३, प्लॉट नंबर ६२ या मिळकतीसह बंगला जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बंगला प्रतिनिधिक स्वरूपात ताब्यात घ्यावा आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याची विक्री करण्यासंदर्भात सूचित केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

संजय काकडे यांनी या गृहनिर्माण संस्थेची मिळकत, बंगला आणि काकडे पॅराडाईज या तीनही स्थावर मालमत्ता लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक, इंडियाबुल्स हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड, आणि समता नागरी को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडे गहाण ठेवल्या होत्या. त्याबदल्यात कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतलेले होते.

या कर्जाची परतफेड करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बँकांनी उच्च न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने काकडे यांची मिळकत जप्त करण्याचे आणि त्याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.