'अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?' किशोरी पेडणेकर चंद्रकांत पाटलांवर संतप्त 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?' किशोरी पेडणेकर चंद्रकांत पाटलांवर संतप्त 

मुंबई -

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत. अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का, असा सवाल करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. चंद्रकांत दादा हे भाजपचे एक मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढत जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. मात्र, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, चंद्रकांत दादांची किव येते. ते मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत मी बोलणे योग्य होणार नाही. भाजप नेते सातत्याने स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. ही हिंदू धर्माची शिकवण नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली आगपाखड व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की, रश्मी ठाकरे या कधी लाइमलाईटमध्ये नसतात. रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. ते सहन केले जाणार नाही. मात्र, अमृता फडणवीस सतत ॲक्टीव आणि लाइमलाईटमध्ये असतात. त्यांना विरोधी पक्षनेत्या बनवणार का, असा सवालही त्यांनी केला. जर भाजपचे नेते असंच बोलणार असतील तर आम्ही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.