तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींचा उल्लेख करत संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींचा उल्लेख करत संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला
तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळींचा उल्लेख करत संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

कोल्हापूर, (प्रबोधन न्यूज) - राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी या जागेवर  बाजी मारत  शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत निवडणुकीच्या अगोदरच खटके उडालेले संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्वीट केले आहे.

 संभाजीराजे यांनी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. संभाजीराजेंनी ट्वीटच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।

तुकाराम महाराजांचा हा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट केला आहे. या अभंगाचा अर्थ ‘वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. असा या अभंगाचा अर्थ आहे. हा अभंग ट्वीट करत संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी तर आमची 42 मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती. पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा 42 मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अटी लादत होती हे निकालानंतर सिद्ध झाले आहे.

दुसरीकडे संभाजी राजे समर्थक छावा प्रमुख धनंजय जाधव यांनीही ट्विटर वर यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, “शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. संजय राऊत आता कसं वाटतयं… गार गार वाटतयं. संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला सांगणारे मागील ३० वर्षांपासून शिवबंधन बांधलेल्या कार्यकर्त्याला निवडून आणू शकलेले नाहीत.

छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेने बिनशर्त खासदार करावं अशी अनेक आमदारांची सुप्त इच्छा होती. परंतु शिवसेनेने शब्द फिरवल्याने आणि नाहक अटी, शर्ती घातल्याने ते शक्य झाले नाही. पण छत्रपती घराण्याचा अपमान सहन न झालेल्या आमदारांनी शिवसेना, वाचाळवीर संजय राऊत आणि महाविकासघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली. संभाजीराजेंना जर अपक्ष परंतु पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती”. पक्षाच्या नावात “शिव” वापरुन रॉयल्टी खाललीत. आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊन देनार नाही”, असे छावाप्रमुख धनंजय जाधव ( संभाजीराजे समर्थक ) यांनी नमूद केले आहे.