आमची निवडणूक बेरोजगारी, महागाई, दादागिरी विरोधात, बिनविरोध परंपरा भाजपने मोडलेली आहे - मेहेबूब शेख
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
युवक राष्ट्रवादीच्या पिंपळे सौदागर मेळाव्यात भाजपला सुनावले
चिंचवड - पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पिंपळे सौदागर येथे कार्यकर्ता मेळाव्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख यांनी प्रचाराच्या रणनीतीबद्दल कार्यकर्त्यांना संबोधित केले.
मेहेबूब शेख म्हणाले की, आमचा विरोध भाजपच्या हुकूमशाही व लोकविरोधी कारभाराबद्दल आहे. जणू काही 70 वर्षात या देशात या शहरात काहीच विकास नव्हता, 2014 पासून सर्व काही प्रगती मोदी राजवटीत झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात इथे उद्योगधंदे, लाखो रुपयांचे वेतन देणाऱ्या आयटी कंपन्या आल्या आहेत. मागील चाळीस वर्षात विकास झाला आहे. भाजप जनतेमध्ये भ्रम पसरवत आहे, असे मेहबूब शेख म्हणाले.
परंपरा आणि संस्कृती आम्हाला कळते. असे म्हणत शेख पुढे म्हणाले, भाजपने पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर येथे दिवंगत आमदारांच्या विरोधात पोटनिडणुकीत उमेदवार देऊन परंपरा व लोकशाही संस्कृती नष्ट केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होऊ नये व त्यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपने कारस्थाने केली,शेवटी त्यांना न्यायालयात जाण्याची वेळ आली.भाजपने तिथे गद्दारी करून नोटा वापरून महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके यांना पराभूत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे म्हणाले "महाविकास आघाडीचे नाना काटे हे सध्या निवडणूक प्रचारात आघाडीवर असून त्यांची लोकप्रियता कमालीची वाढत आहे त्यामुळे भाजपाला त्यांचा पराजय डोळ्यांनी दिसत असून त्यांनी केलेल्या कामावर न बोलता ते फक्त सहानभूतीवर निवडणूक लढत आहेत. प्रत्येक ठिकाणी रडून रडून मतदान मागत असल्याची टीका रविकांत वर्पे यांनी केली.
शहराध्यक्ष इम्रान भाई शेख म्हणाले की, भाजपने महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला दिले आहेत, त्यांनी गुजरात मध्ये जाऊन मतदान मागावे. पुणे जिल्ह्यातील तळेगावसह इतर सर्व प्रकल्प गुजरातला दान करून महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करणाऱ्या 2014 साली खोटी आश्वासने देणाऱ्या मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. ही लढत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल नाना काटे तीस हजार मताधिक्याने जिंकतील असा दावा इम्रान शेख यांनी केला. प्रशांत शितोळे यांनी युवकांना बुथ मॅनेजमेंटवर प्रशिक्षण दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे. प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामटे, प्रदेश उपाध्यक्ष मयूर गायकवाड, विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस गौतमजी आगा, चिंचवडचे निरीक्षक महेश हांडे, प्रदेश सचिव डॉक्टर अरुण शिंदे, पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे पुणे शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुळे तसेच पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख आणि पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.