मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; 5 आरोपींना अटक, 4 महिलांची सुटका

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; 5 आरोपींना अटक, 4 महिलांची सुटका

पुणे, (प्रबोधन न्यूज) - बुधवार, दि. ३/८/२२ रोजी वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार या उच्चभ्रू परीसरातील 'गोल्डन टच स्पा', डी १०१/१०२, गिरमे हाईट्स, साळुंखे विहार रोड, वानवडी, पुणे येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने, सेंटरवर धाड टाकण्यात आली. या वेळी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी स्पा सेंटर चालविणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली तर 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. आरोपींपैकी एक महिला परराज्यातील आहे. तर ४ पीडित महिलांपैकी एक छत्तीसगड राज्यातील व एक पश्चिम बंगाल राज्यातील आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे - १) मॅनेजर - झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल, वय २७ वर्षे, धंदा - स्पा मॅनेजर, रा.ठी. - ज्योती हॉटेलजवळ, कोंढवा, पुणे, मूळ राहणार - पश्चिम बंगाल. २) मॅनेजर - सुमित अनिल होनखंडे, वय - २१ वर्षे, धंदा - स्पा मॅनेजर, रा.ठी.शिवनेरी नगर, गल्ली नंबर २७, कोंढवा खुर्द, पुणे. ३) स्पा मालक - श्रीमती रचना संतोष साळुंखे उर्फ रचना डोंगरे उर्फ रचना नवगिरे, धंदा - स्पा चालक व मालक, रा.ठी. फ्लॅट नंबर १, पहिला मजला, केदारेश्वर हाईट सोसायटी, कोंढवा बुद्रुक,  येवलेवाडी, पुणे. ४) लोचन अनंता गीरमे, धंदा - स्पा सहकारी तथा स्पा मालक, रा.ठी. वानवडी, पुणे (पूर्ण पत्ता माहीत नाही). ५) सार्थक लोचन गिरमे, धंदा - स्पा मालक, रा. - वानवडी (पूर्ण पत्ता माहित नाही)

या कारवाईत रोख रकमेसह एकूण १७,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही  छापा कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, म.पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, मपोहवा नीलम शिंदे, मपोहवा राजश्री मोहीते, पो हवा अजय राणे, पोना इरफान पठाण,  पोना हणमंत कांबळे, पोना सुरेंद्र साबळे, पोशि साईनाथ पाटील, पोशि अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.