दुचाकीवर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दुचाकीवर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू 

नाशिक फाटा ते भोसरी मार्गावर अपघात 

पिंपरी, (प्रतिनिधी) - नाशिक फाटा ते भोसरी मार्गावर एका दुचाकीवर झाड पडले. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी घडली. या घटनेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. समाधान नथू पाटील (वय 36, रा. राजगुरूनगर, पुणे), निलेश राजेश शिंगाळे (वय 37, रा. अमरावती) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. झाडाच्या मुळाशी कीड लागली असल्याने ते अचानक उन्मळून पडले. 

समाधान पाटील आणि निलेश शिंगाळे हे दुचाकी (एमएच 14/ईझेड 5035) वरून नाशिक फाटा ते भोसरी या मार्गावरून जात होते. भोसरी पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीवर मोठे झाड अचानक उन्मळून पडले. यात समाधान यांचा जागीच मृत्यू झाला. तर निलेश हे गंभीर जखमी झाले. त्याच वेळी त्यांच्या दुचाकीच्या मागून पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान श्रीकांत वैरागर हे जात होते. त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. दरम्यान महापालिकेच्या वायसीएममधील कर्मचारी रुपाली उबाळे आणि श्रीकांत वैरागर यांनी जखमीवर प्रथमोपचार केले. जखमी निलेश यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

झाडाच्या मुळाशी कीड लागली असल्याने ते अचानक उन्मळून पडले. संपूर्ण रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता बंद झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी भर रस्त्यात पडलेले झाड कापून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.