महाराष्ट्राची एसटी बस मध्य प्रदेशमध्ये नदीत कोसळली
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
१५ जणांना वाजवण्यात यश, १३ मृतदेह सापडले, २० जण बेपत्ता
खालघाट (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोनदरम्यान सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून पुण्याला जाणारी बस सकाळी 10.45 वाजता धामनोद येथील खलघाटाजवळ नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ५५ प्रवासी होते. आतापर्यंत 1३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये 7 पुरुष आणि 4 महिलांचे मृतदेह आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आणखी २० ते २५ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये ५०-५५ जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
खालघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बसचे नियंत्रण सुटले, असे सांगण्यात आले. चालकाचा तोल गेला आणि बस कठडे तोडून नदीत पडली. अपघाताची माहिती मिळताच खालघाटासह आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. इंदूर आणि धार येथील एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
आग्रा-मुंबई (एबी रोड) महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदूरला महाराष्ट्राला जोडतो. घटनास्थळ इंदूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. संजय सेतू पूल ज्यावरून बस पडली तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) येथे आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.