विद्यार्थ्यांशी संवाद : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आयुक्तांची समर्पक उत्तरे

विद्यार्थ्यांशी संवाद : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आयुक्तांची समर्पक उत्तरे



पिंपरी,  (प्रबोधन न्यूज )  - समाजात विद्यार्थी हे जास्त प्रमाणात जागरूक असतात. त्यांनी आपली क्षमता ओळखून समाज कार्याची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपले कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाज घटकांशी संवाद साधला जातो. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील भारताचे नागरिक आहेत. त्यांच्या मनातील विविध विचार, प्रश्न जाणून घेणे हे शहराच्या विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते.

त्या अनुषंगाने दि. ११ जुलै रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा शहरातील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे उपायुक्त रविकिरण घोडके, ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य मनोज देवळेकर, पर्यवेक्षक सुधीर कुलकर्णी, पर्यवेक्षिका कल्याणी पटवर्धन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  उषा मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मा. आयुक्तांशी थेट संवाद साधला. त्यांना विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांना आयुक्तांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली. शहराचा विकास, त्यासंदर्भात आपली भूमिका इत्यादी विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.