परशुराम घाट नंतर विक्रोळी व कल्याणमध्ये दरड कोसळली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

परशुराम घाट नंतर विक्रोळी व कल्याणमध्ये दरड कोसळली

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - गोवा महामार्गावर चिपळूण जवळ परशुराम घाटात काल दरड कोसळली होती. यामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प आहे. आता त्यानंतर विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर दरड कोसळल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण पूर्व भागात पत्रीपुलाजवळ डोंगरावरील हनुमान नगर भागात दरड कोसळली आहे. या दरडीपासून काही अंतरावर घरे असल्याने सुदैवाने जीवित, वित्तहानी झाली नाही.

कल्याण पूर्वेत हनुमाननगर भागात अनेक नवीन झोपड्या बांधल्या आहेत. झोपड्या बांधताना या भागात खोदकाम केले जाते. पावसाळ्यात खोदलेला भाग खचून तो कोसळतो. हनुमाननगर भागात दरड कोसळली. त्यावेळी परिसरात कोणी रहिवासी नव्हते. या दरडीपासून घरे लांब आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. त्यातच, आता विक्रोळीतील पंचशील नगर येथे घरांवर झाडे उन्मळून दरड कोसळली आहे. यामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्याची मदत सुरु.