पीसीसीओई आणि हेन्केल अढेसिव्ह टेक्नॉलॉजीस् यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार 

पीसीसीओई आणि हेन्केल अढेसिव्ह टेक्नॉलॉजीस् यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार 

 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) संचालित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आणि अढेसिव्ह, फॅब्रिक सॉफ्टनर, सीलंट, उत्पादने निर्माण करणारी आघाडीची कंपनी असणाऱ्या हेन्केल अढेसिव्ह टेक्नॉलॉजीस्
यांच्यामध्ये सामंजस्य करार नुकताच करण्यात आला.


संशोधन आणि तंत्रज्ञान विषयक सुसंवाद, विविध परिषदांमध्ये संशोधनात्मक प्रबंध सादरीकरण आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम या बाबी सामंजस्य करारामध्ये अंतर्भूत आहेत.
हिंजवडी स्थित हेन्केल इनोव्हेशन सेंटर येथे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पीसीसीओईच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये
हेन्केल अढेसिव्ह टेक्नॉलॉजीस् यांचा सक्रीय सहभाग होता. दि.२६ आणि २७ ऑगस्ट २०२२ दरम्यान संपन्न झालेल्या पहिल्या 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इनोव्हेशन इन मेकॅनिकल ॲण्ड सिव्हिल इंजिनिअरिंग' (i-MACE) मध्ये हेन्केल हे प्लॅटिनम प्रायोजक होते. हेनकेल द्वारे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमानंतर्गत ६५० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी येथील प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचप्रमाणे हेन्केल मध्ये पीसीसीओईच्या १२ विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप देखील पूर्ण केली आहे. 
पीसीसीओईच्या अढेसिव्ह टेक्नॉलॉजी, AI-ML बेस्ड रेलाइबिलिटी इंजिनियरिंग हे अभ्यासक्रम निश्चित करण्यात देखील हेन्केल अढेसिव्ह टेक्नॉलॉजीस् यांचा सहभाग होता.

या सामंजस्य करारासाठी पीसीसीओईच्या वतीने संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, यांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. ए. देशमुख, डॉ. राजकुमार बी. पाटील, सहाय्यक प्रा. आणि संशोधन आणि विकास समन्वयक यांत्रिकी विभाग, डॉ. अमित पंचवाडकर, मेकॅनिकल विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. गोविंद एस. वाघमारे, मेकॅनिकल विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. अरुण खालकर, ए. एस. ॲण्ड एच. विभागाचे सहाय्यक प्रा. प्रमोद सोनवणे, इ ॲण्ड टीसी विभागाचे सहाय्यक प्रा. गफ्फार मोमीन, मेकॅनिकल विभागाचे सहाय्यक प्रा. करण खरे तर हेन्केल अढेसिव्ह टेक्नॉलॉजीस् यांच्यावतीने निलेश आडकर, ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग मॅनेजर आशुतोष मिश्रा, टेरिटरी सेल्स मॅनेजर जिगर शाह, वरिष्ठ अनुप्रयोग अभियंता पियुष सोनमोरे,ॲल्पिकेशन इंजिनीअर इशिका रुंगटा आदी उपस्थित होते.

  पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.