विवरण पत्र सादर न केल्यास पदोन्नती, प्रतिनियुक्ती नाही – आयुक्त राजेश पाटील

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विवरण पत्र सादर न केल्यास पदोन्नती, प्रतिनियुक्ती नाही – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः आणि कुटुंबाच्या मालमत्तांचे विवरण पत्र 31 मे 2022 अखेरपर्यंत प्रशासनाला सादर करावे. तसेच विवरण पत्र सादर न केल्यास भविष्यात मिळणारी पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती देण्यात येणार नाही. त्याचबरोबर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या नियमानुसार महापालिकेतील 'अ', 'ब' आणि 'क' या वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मालमत्तांची आणि दायित्वाची दरवर्षी महापालिकेला माहिती सादर करणे बंधनकारक आहे. विवरण पत्र नसल्यास पदोन्नती किंवा सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनांच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात येईल. पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौऱ्यास विवरण पत्र असेही गरजेचे आहे. वर्ग-1 आणि वर्ग-2 मधील अधिकारी, कर्मचा-यांनी 31 मे अखेर मालमत्ता विवरण पत्रांची बंद पाकिटातून माहिती सादर करावी.

वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांनी संगणक क्रमांक,अधिकारी, कर्मचान्यांचे नाव, पदनाम,मालमत्ता विवरण पत्र सादर केले आहे काय? अशाप्रमाणे माहिती सादर करावी. मुदतीत विवरण पत्र सादर न केल्यास हे गैरवर्तन मानण्यात येणार आहे. तसेच अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.