अलिबागमधील नाट्यगृहाला भीषण आग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अलिबागमधील नाट्यगृहाला भीषण आग

अलिबाग, (प्रबोधन न्यूज) -  रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये लगत असलेल्या पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. नाट्यगृहाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळतायेत. नाट्यगृहाला आग लागल्याचं समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली.

संध्याकाळी 5 च्या दरम्यान ही आग लागल्याचं सांगितंल जातंय. बघता बघता आगीने रौद्ररुप घेत नाट्यगृहाला विळखा घातला. संपूर्ण नाट्यगृहात आगीचा भडका उडाला आहे. त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट दिसून येत आहे. या नाट्यगृहात वेल्डिंगचं काम सुरु होतं. या कामादरम्यान ही आग लागल्याचं म्हटलं जातंय. या आगीत सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी तसेच कोणीची जखमी झालेलं नाही. मात्र नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं आहे.

आगीत नाट्यगृहातील खुर्च्या, छत, साउंड सिस्टीम या आणि अशा विविध वस्तुंचं नुकसान झालंय. दरम्यान ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.